धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या १ कोटी ८४ लाख ८४ हजार रुपये प्रकरणी राज्यातील एकाही आमदाराने नुकत्याच झालेल्या अधिवेशनात सरकारला प्रश्न विचारला नाही.हे महाराष्ट्राच्या जनतेच दुर्दैव असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अनिल गोटे यांनी केले
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी,' हा विधिमंडळाच्या अस्मितेचा प्रश्न असून, विधिमंडळाचे पावित्र्य राखण्याकरिता, आपण एसआयटी स्थापन करू अशी घोषणा केली. परंतु दोन महिन्याचा कालावधी जाऊनही कुठलीही एसआयटी समिती नेमली नाही. या संदर्भात राज्यातील एकही आमदाराने मुख्यमंत्र्यांना विचारणा केली नाही म्हणून माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकाद्वारे राज्यातील सर्वच आमदारांविषयी शंका व्यक्त केली