-डिजे साहित्य चोरणाऱ्या टोळीतील चौघांपैकी दोघांच्या मुसक्या धुळे एल.सी.बी.च्या पथकाने आवळल्या असून, त्यांच्याकडून सुमारे पावने तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटकेतील चोरट्यांच्या दोन साथीदारांचा शोध एल.सी.बी. घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी यावेळी दिली.
- धुळे तालुक्यातील शिरढाणे येथील किरण भटू कोळी हे ऑपरेटर म्हणून काम करीत असलेल्या डि.जे. वाहनातून लाखो रुपये किंमतीचे डी.जे. साहित्य लंपास केले होते. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात गुन्ह्या दाखल झाला होता, या गुणाची उकल करत धुळे एल.सी.बी. व तालुका पोलिसांच्या वतीने समांतर तपास करण्यात येत होता. या गुणाचा तपास करीत असताना, धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकांनी समाधान ठाकरे व योगेश कोळी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दोघांनी डीजे साहित्य चोरले असल्याची कबुली देत तब्बल २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. याप्रकरणी दोघा विरोधात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी यावेळी दिली.