अवयवदान चळवळीसाठी सातत्याने कार्यरत असणारे डॉ.भाऊसाहेब मोरे

अवयवदान चळवळीसाठी सातत्याने कार्यरत असणारे डॉ.भाऊसाहेब मोरे
  • MG News
  • जुलै 8 2025

Share on  

 आज दुपारी नाशिक शहरातील सुप्रसिद्ध ऋषिकेश हॉस्पिटलचे मालक डॉ.   भाऊसाहेब मोरे पाटील यांच्या निधनाचे वृत्त  समाजमाध्यमांवरआले आणि  धक्काच बसला. नाशिक शहरांमध्ये सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना दिव्यांग सेवा असेल आणि रुग्णसेवा या दरम्यान डॉ.  श्री. भाऊसाहेब मोरे यांनी नाशिक शहरात जी गरीब- गरजू लोकांसाठी अवयव दान चळवळ चालू केली होती. त्यात आपलाही कुठेतरी सहभाग असावा आपले योगदान असावे म्हणूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम  करायचे म्हणून प्रत्यक्षात भेटी झाल्यात.अगदी त्यांनी माझ्यासह  सहकाऱ्यांना घरी बोलून चहा नाश्ता वगैरे देऊन आणि ते या अवयव दान चळवळी सक्रिय कसे झाले, त्यांच्यावर आलेले प्रसंग ,शिक्षण, जबाबदाऱ्या याची त्यांनी आम्हाला बऱ्याच वेळा  माहिती दिली.

त्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक आमच्या  सारखे सामाजिक कार्यकर्ते ज्यांना किडनीविकार होते त्यांच्या वर किडनीचे  प्रत्यारोपण करण्याचे  काम कमी खर्चात करून दिले . 
सन २०२१- २२ च्या दरम्यान  नाशिक शहरात मी  , महेश आडके व इतर सहकारी अवयवदान जनजागृतीसाठी चळवळ चालवली.  त्या चळवळीत त्यांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केले. आम्ही शहरांमध्ये अनेक  ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम घेतले. त्या कार्यक्रमात डॉ. भाऊसाहेब मोरे पाटील हे स्वतः आपला अमूल्य वेळ काढून कार्यक्रमाला येत   आणि उपस्थितांना अवयवदानाबद्दल  जागृती   करत.   एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे  पाच लोक तरी जिवंत राहतात याचे  महत्त्व  ते नेहमी पटवून देत.  त्यांच्या मनात श्रद्धा असायची   पण अंधश्रद्धा कधी नव्हती  आणि एवढे मोठे तज्ञ डॉक्टर असूनही त्यांच्या अंगी मोठेपणा गर्व अहंकार कधीही आम्हाला जाणवला नाही.  सामान्यांशी समरस  होऊन बोलणे, गरीब सामान्य रुग्णांना सहकार्य करणे मार्गदर्शन करणे आणि नाशिक जिल्यासह  महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी त्यांचे मोठे कार्यक्रम झाले आहेत त्याबद्दल त्यांनी आम्हाला भरपूर माहिती दिली होती. अशा अनोख्या आणि सर्वाना मदतीसाठी धावून जाणाऱ्या डॉ. भाऊसाहेब मोरे यांना  भावपूर्ण श्रद्धांजली ... 

दत्तू बोडके 
उत्तर महाराष्ट संपर्कप्रमुख 
प्रहार जनशक्ती पक्ष 
नाशिक 
 

संबंधित बातम्या