दारुड्या मर्सिडीज चालकाने घेतला कीर्तन करुन जाणारा निष्पाप जीव

दारुड्या मर्सिडीज चालकाने घेतला कीर्तन करुन जाणारा निष्पाप  जीव
  • MG News
  • मे 3 2025

Share on  

पुणे : शहरातील नवले पूल परिसरात पुन्हा एकदा अपघाताचं सत्रपाहायला मिळालं आहे. तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा बळी गेला आहे. त्यामध्ये एका प्रकरणात महाविद्यालयातील तरुणाने दारूच्या नशेत गाडी चालवली आणि निरपराध तरुणाचा जीव घेतला. मधल्या काळात अपघातांची मालिका थांबलेल्या नवले पूल परिसर आता पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं दिसंतय.

पहिला अपघात शनिवारी पहाटे 3.30 वाजता झाला. शुभम भोसले या महाविद्यालयीन तरुणाने दारू पिऊन मर्सीडिज कार चालवली आणि त्या कारने धडक दिल्याने कुणाल हुशार या तरुणाचा बळी गेला. शुभम भोसले आणि त्याचे मित्र निखील रानडे, श्रेयस सोळंखी आणि वेदांत इंद्रसिंग राजपुत या चौघांनी आधी हिंजवडी परिसरात दारु पार्टी केली. त्यानंतर ते पुणे बंगळुरु महामार्गावरुन कात्रजच्या बोगद्याच्या दिशेने गेले. 

तिथून परत येत असताना वडगाव पुलावर त्यांनी किर्तनाचा कार्यक्रम उरकून घरी निघालेल्या कुणाल हुशार आणि प्रज्योत पुजारी यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामधे कुणाल हुशारचा मृत्यू झाला. तर प्रज्योत पुजारी हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी पुण्यातील सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

संबंधित बातम्या