उशिरा का होईना आता सगळ्यांना कळू लागले की हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना कोणाची आहे.. त्यामुळे आता हळूहळू सगळेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. अस मत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केल आहे. ते सांगलीच्या तासगाव मध्ये बोलत होते.
वाघ्या कुत्र्याच्या स्मारक आणि शिवाजी महाराजांच्या अपूर्ण स्मारकाबाबत आपण बोलणं उचित नाही. संभाजी महाराज आणि उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपली भूमिका मांडली आहे. पत्र ही दिले आहे,याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी भूमिका उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे.
उबाठा शिवसेनेचे अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये येत आहेत. सांगली मध्ये देखील आपल्याला परिस्थिती माहीत असेल त्यामुळे आता भिंग घेऊन उबाठा पदाधिकाऱ्यांना शोधावं लागत आहे,असा टोला उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेला लागवला आहे.