फडणवीसांना खोटं बोलण्याचा आणि विस्मरणाचा आजार  :संजय राऊत 

फडणवीसांना खोटं बोलण्याचा आणि विस्मरणाचा आजार  :संजय राऊत 
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

तुमच्याकडे १कोटी ४०लाख रूपये नाहीत का? सरकारी कंत्राटदारांचे ८०,००० कोटी थकले आहेत. इतकेच नव्हे तर पैसे वसूल होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर जाळून घेण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. मात्र हे मोदींप्रमाणे मौजमजा करत फिरत आहेत.असे प्रतिपादन संजय राऊत यांनी केले.सांगली जिल्ह्यातील हर्षल पाटील या सरकारी कंत्राटदाराने पैसे थकल्यामुळे आत्महत्या केल्याचा पार्श्वभुमीवर ते बोलत होते.फडणवीसांना खोटं बोलण्याचा आणि विस्मरणाचा आजार झाल्याचा टोला सुद्धा लगावला. मंत्र्यांच्या लूटमारीनं, जलजीवन, एमएमआरडीए, नगरविकासाच्या भ्रष्टाचाराने सरकार अडचणीत आल्याचे ते म्हणाले. लाडक्या बहिणीमुळे होणारे घोटाळे यामुळे राज्य डबघाईस आलं असल्याचं देखील  संजय राऊत यांनी सांगितले. 

 

संबंधित बातम्या