इंदिरानगर - इंदिरानगर बोगद्याकडून सिटी सेंटर मॉलकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या फोर्च्यूनर गाडीने दिलेल्या धडकेत इंदिरानगर येथील रहिवासी व रचना विद्यालयाच्या शिक्षिका गायत्री संदीप ठाकूर (वय ३८ ) राहणार अनुश्री अपार्टमेंट गुरू गोविंदसिंग कॉलेज इंदिरानगर यांचा मृत्यू झाला या धडकेत एक पुरुष आणि एक महिला जखमी झाले आहेत.
मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गायत्री ठाकूर या गोविंद नगर कडे जाणाऱ्या मनोहर गार्डन शेजारी असलेल्या रसवंतीच्या गाड्यावर आपल्या सहकारी शिक्षकांसोबत उसाचा रस पिण्यासाठी थांबल्या होत्या. त्याच वेळी इंदिरानगर बोगद्याकडून भरधाव वेगाने आलेल्या फोर्च्यूनर वाहन क्रमांक एम एच १४ जे ९०० या गाडीने जोरदार धडक दिली. या अपघाताला कारणीभूत ठरलेला चालक सौरभ भोपे यांस मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.