शाळेच्या आवारातच  मुख्याध्यापिका आणि  शिक्षिका यांच्यात हाणामारी 

शाळेच्या आवारातच  मुख्याध्यापिका आणि  शिक्षिका यांच्यात हाणामारी 
  • MG News
  • मे 4 2025

Share on  

शाळेच्या आवारातच  मुख्याध्यापिका आणि  शिक्षिका यांच्यात हाणामारी 
 खरगोण : मध्य प्रदेशमधील खरगोनमधील एकलव्य आदर्श आवासीय विद्यालय  येथे मुख्याध्यापक आणि ग्रंथालयात काम करणाऱ्या महिला शिक्षिका यांच्यात भांडण झाल्याची एक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुख्यध्यापिका आणि ग्रंथपाल हे दोघेही एकमेकांना हाणामारी करताना दिसत आहे. शाळेच्या परिसरातच झालेल्या हाणामारीमुळे खळबळ उडाली. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली असून, दोघांनाही त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले आहे.

सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुख्यध्यापिका प्रवीण दहिया आणि ग्रंथालयात काम करणाऱ्या महिला शिक्षिका मधुराणी यांच्यात जोरदार भांडण सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. व्हिडीओमध्ये, दोघे एकमेकांना मारताना, एकमेकांचे केस ओढताना आणि मोबाईल फोनवर रेकॉर्ड करत एकमेकांना शिवीगाळ करताना दिसत आहेत. घटनेच्यावेळी इतर अनेक शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते, परंतु कोणीही हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट, बरेच लोक व्हिडीओ बनवण्यात व्यस्त होते. अखेर एका महिला कर्मचाऱ्याने मध्यस्थी केली.  

संबंधित बातम्या