ठाणे: ग्राहकाने नियमाप्रमाणे केवायसी केलेली असतानाही कोणतीही सुचना न देता अचानक क्रेडिट कार्ड ब्लॉक करणा-या अमेरिकन एक्स्प्रेस बँकेला ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एक लाखाचा दंड ठोठावला आहे. भारताच्या वेलनेस अँबेसिडर डॉ. रेखा चौधरी यांच्यावतीने एल.आर.अँन्ड असोसिएट यांनी ग्राहक मंचात चौधरी यांची बाजू मांडली. . रेखा चौधरी गेल्या 10 वर्षांपासून अमेरिकन एक्सप्रेस प्लॅटिनम क्रेडिट कार्ड वापरत आहेत. मात्र बँकेने सी.बी. शंकर यांच्या नावाने जारी केलेले डॉ, रेखा चौधरी यांचे सप्लिमेंटरी कार्ड केवायसी प्रक्रिया पुर्ण न केल्याचे कारण देत ब्लॉक केले. मात्र डॉ. रेखा चौधरी यांनी 16 जानेवारी 2020 रोजीच आवश्यक केवायसी कागदपत्रे सादर केली होती. बँकेने हे कागदत्रे बरोबर असल्याने केवायसीसाठी जमा करुन घेतली होती. मात्र, त्यांचे केवायसी करुन घेतले नाही. तसेच चौधरी यांचे कार्ड कोणतीही सुचना न देता ब्लॉक करुन टाकले.