नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात  अतिदक्षता नवजात शिशू कक्षात आग 

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात  अतिदक्षता नवजात शिशू कक्षात आग 
  • MG News
  • एप्रिल 3 2025

Share on  

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात  अतिदक्षता नवजात शिशू कक्षात आग 
नाशिक जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू कक्षात शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याची घटना घडली आहे. छोट्या बाळांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. कक्षात 66 नवजात बालक होते, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या दृष्टीनं पावलं टाकण्यात येत आहे. शॉर्ट सर्किट झाल्यानंतर त्वरित सर्व बालकांना दुसऱ्या कक्षात हलवण्यात आलं.सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. शॉर्ट सर्किट झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व परिचरिकांनी लगेच बालकांना सुरक्षित दुसऱ्या कक्षात हलवले.
नाशिक जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना दुपारच्या वेळी घडल्याची माहिती रुगणालयातील उपस्थितांनी दिली. यानंतर रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी आगीच्या घटनेसंदर्भातील माहिती दिली. नाशिकचे अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. प्रमोद गुंजाळ यांनी यासंदर्भातील माहिती दिली.  ते म्हणाले. डॉ. प्रमोद गुंजाळ म्हणाले की नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू कक्षात लागलेली आग ही शॉर्ट सर्किटनं लागली होती. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व नवजात बालकं सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली. 
दरम्यान, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू कक्षात लागलेल्या आगीमुळं अनेकांची धावपळ झाली. अतिदक्षता कक्षातून नवाजत बालकांना आणि त्यांच्या मातांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. मात्र, शॉर्ट सर्किट कोणत्या कारणानं झालं हे समोर आलं नाही.  

संबंधित बातम्या