सोलापूर विमानतळावरून २६ मे पासून विमान सेवा सुरू होणार
- सोलापूर विमानतळावरून विमान सेवा २६ मे पासून सुरू होणार आहे . १६ मे पासून विमानसेवेची बुकिंग सुरु होणार आहे .
- आठवड्यातून दोन दिवस सोलापूर गोवा विमानसेवा असणार, सोमवार आणि शुक्रवार गोव्यासाठी उडान राहणार आहे.
- १६ मे पासून ऑनलाईन आणि विमानतळावरून तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध होईल .
- गोव्यातून सोलापूर साठी सकाळी ७:२० मिनिटांनी विमान उडेल, तर सोलापुरातून गोव्यासाठी ८:५० मिनिटाने विमान उडणार
- सोलापूर विमानतळ विमान सेवेसाठी पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती
- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.