गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट  

  गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट  
  • MG News
  • मार्च 30 2025

Share on  

चैत्र गुढीपाडवा व मराठी नववर्षाप्रारंभ निमित्त आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यामुळे श्रींचा गाभारा मनमोहक दिसत आहे. सजावटीसाठी शेवंती 200 किलो, अष्टर 80 किलो, गोंडा 150 किलो, गुलाब 100 गड्डी, जिप्सी 10 गड्डी या फुलांचा  वापर करण्यात आला  सदरची सजावट विठ्ठल भक्त  नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील रा. रांजणगाव महागणपती यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत केली असून, सजावटीचे काम श्री फ्लॉवर्स, पुणे यांनी केले आहे. यासाठी सुमारे 12 कामगारांनी परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या