- माझी एकच ओळख करून दिली असती तरी चालली असती
- सहकाऱ्यांनी माझ्याबद्दल बोललं म्हणून मला त्यांच्याबद्दल बोलावे लागेल
- गोष्ट संविधानाची निर्मिती करणे ही क्रांतिकारी घटना
- जायभावे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन
- इतर राज्यातील बार कौन्सिलला विनंती करा
- प्रत्येक भाषेत हे करा, मराठी हिंदी इंग्लिश पुरते मर्यादित ठेऊ नका
- दीपप्रज्वलन टाळून संविधानाचा सन्मान करून कार्यक्रम करणे ही प्रथा पाळली याचा आनंद
- घटनेच्या तत्वात पूजा शब्द बसत नाही, घटनेचा आपण आदर करतो
- घटनेच्या गाभा आहे त्याला कधीही कुणाला धक्का लावता येणार नाही
- अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा सुद्धा गाभा याचाच एक भाग
- केशवानंद भारती यांचा निकाल लोकशाही अबाधित ठेवणारा आहे
- डाव्या आणि उजव्या बाजूला असलेल्या देशांचे काय झाले बघा
- न्यायाधीश यांनी भारती यांना प्रश्न विचारले होते
- घटनेचा गाभा बदलता येणार नाही हे राज्यकर्त्यांना सांगायचे होते
- १३ लोकांचे खंडपीठ होते, दप्तरी साहेबांना एक मुलगी येऊन भेटली होती
- २४ एप्रिल १९७३ ला निकाल लागला होता
- ३ जेष्ठ न्यायाधीश होते त्यांनी निकाल दिला होता, त्यांना किंमत मोजावी लागली होती
- राजीनामा द्यावा लागला होता, म्हणूनच आज घटना उभी आहे
- त्यावेळी वकिलांनी ठराव केला होता, त्यागाची परंपरा
- न्यायमूर्ती खन्ना यांनी आत्मचरित्र लिहिलं होतं
- निकालपत्र लिहिलं आहे त्यात मुख्यन्यायमूर्ती होणार
- काही महिन्यानंतर त्यांची जेष्ठता डावलली गेली
- काही निकाल देतांना मनात विचार येतात हे आपण पाहिले
- निकाल देतांना काही लोकांनी त्याग केला आहे
- जेष्ठता डावलून न्यायमूर्ती केले तर राजीनामा देऊ अशी भूमिका घेतली होती
- सरकारने ध्वनित केले होते, दखल घेतली पाहिजे
- अनेक वकिलांनी अतिशय कठीण परिस्थितीत धोका पत्करून खटले चालविले
- तारकुंडे यांनी शासनाचा रोष पत्करून विना मोबादले खटले चालविले
- बार कौन्सिल ने कार्यक्रम घ्यावे त्यात यांचा उल्लेख झाला पाहिजे
- पत्रकारांची कर्तव्ये याबाबत उहापोह केला पाहिजे
- निर्भय पत्रकारिता लोक होते, आजही आहे
- टिळक यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला होता
- स्वतःच्या बचावाची भाषण त्यांनी केलं होतं
- केसरी आणि मराठा वृत्तपत्रात लिहिलं आहे ते जाणूनबुजून लिहिलं आहे त्याची जबाबदारी घेतो
- मला जे पटलंय ते लिहिलं आहे, सरकारबद्दल चुकीचं लिहिण्याचे अधिकार
- मी जे लिहिलं ते शासनाला आवडलं नाही म्हणजे राजद्रोह होउ शकत नाही
- पत्रकारांच्या स्वातंत्र्याचा विचार केला नाहीतर ही परिस्थिती तशीच राहील
- मी सरकारला आवडत नसेल तरी मला न्याय मिळाला पाहीजे
- स्वातंत्र्याचे रक्षण करणे न्यायाधीशांच कर्तव्य आहे
- पत्रकारांची सुद्धा ही जबाबदारी आहे
- एका इंग्रजी वृत्तपत्राने निषेध व्यक्त केला होता
- संपादकीय कोरे ठेवले होते
- trp वैगरे तेव्हा प्रकार नव्हता
- झणझणीत अंजन घालणारे लोकं होऊन गेले
- न्यायाधीश यांच्याबाबतही मी बोललो, काही लिहिलं तर काही होईल
- तसा पत्रकारही विचार करत असतील
- पत्रकारांचे लोकं ऐकतात, खरं ते लिहायचे
- शासनाने चुकीचं केलं असेल तर ते ठामपणे सांगितले पाहिजे
- विचारांचा मुकाबला करायचे असेल तर तो विचारानेच, हातात कायदा घेऊ नये
- चुकीचं लिहिलं गेलं तर तो गुन्हा नसतो, विचार कसे चुकीचे आहे ते त्याला सांगितले पाहिजे
- आंदोलनाने प्रश्न मिटत नाही, चुकीचा विचार असेल तर विचाराने उत्तर दिले पाहिजे
- चुकीचं असेल तर ते ठणकावून सांगावे, पण भान असावे
- त्या व्यक्तीला संविधानाने दिलेला अधिकार असतो
- अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सगळ्यात महत्त्वाचे आहे
- आमच्या न्याय व्यवस्थेपुढे जेवढे आदर्श त्यापेक्षा जास्त तुमच्या पुढे आदर्श
- आपण भूमिका बदलली पाहिजे,
- कायद्याचे पालन आपला अविभाज्य भाग झाला पाहिजे
- पत्रकारितेच उपयोग करून लोकशाहीचे संस्कार बिबविण्यासाठी आयुध वापरली पाहिजे
- लोकशिक्षणाचे कार्य पुढे घेऊन जा, न्यायाधीश आपल्या सोबत आहेतच
- पत्रकारांची न्यायाधीशांना साथ पाहिजे आहे
- चांगले वकील बनवून तालुका आणि जिल्हा न्यायालयातच न्याय मिळवून द्या
- तरुण वकील आणि विद्यार्थ्यांना सल्ला, न्यूनगंड न बाळगता वकिली करा
- वकिलांकडे समाज मार्गदर्शन म्हणून बघत असतो
- सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून अकॅशन प्लॅन करत आहोत
- जुने खटले निकाली काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत
- २०२६ पर्यंत आम्हाला तुंबलेले खटले निकाली काढून निकाल द्यायचे
- सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होत चालला आहे
- सामान्य माणसांच्या खटल्यांचा निकाल लवकर लावून तो आपण विश्वास मिळवला पाहिजे
- त्यासाठी वकिलांची आम्हाला मदत हवी आहे
- देशात महाराष्ट्र बार कौन्सिलचे काम सर्वात चांगल
- त्यात राजकारण असतं तरी त्यांनी राजकारण न करता काम केलं