अन्न व औषध प्रशासनाचे छापे चुंचाळे शिवारात लाखोंचा गुटखा जप्त

अन्न व औषध प्रशासनाचे छापे  चुंचाळे शिवारात लाखोंचा गुटखा जप्त
  • MG News
  • जानेवारी 9 2025

Share on  

अन्न व औषध प्रशासनाचे छापे

चुंचाळे शिवारात लाखोंचा गुटखा जप्त

अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयाने जिल्हयातील गुटखा माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे मंगळवार दि. ७ रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने भोर टाऊनशिप, चुंचाळे शिवार, नशिक या ठिकाणी पाळत ठेवत त्याठिकाणी सागर कोठवादे यांच्या राहत्या घरी छापा टाकला त्यामध्ये हिरा पानमसाला, विमल पानमसाला, वाह पानमसाला व सुंगधित तंबाखूचा एकूण साठा २६ हजार १५८ रूपये किंमतीचा विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळले. तसेच सतिश सोनजे यांच्या राहत्या घरात पानमसाला, झेडएल ०१ जाफरानी जदां, केशरयुक्त विमल पानमसाला व व्ही १ तंबाखूचा एकूण १ लाख २० हजार ८७९ इतक्या

किंमतीचा महाराष्ट्र राज्यात विक्री, साठवणूक, वितरण, उत्पादनास बंदी असल्याने साठा अन्न सुरक्षा अधिकारी संदीप तोरणे यांनी पुढील विक्रीस मनाई करून ताब्यात घेवून त्यामधून विश्लेषणासाठी १६ नमूने घेऊन ते अन्न विश्लेषकास विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच विक्रेत्यांविरूध्द साठा हा त्यांनी कुठून कोणाकडून आणला पुरवठादार तसेच उत्पादक शोधण्यासाठी अंबड पोलीस स्टेशन येथे फिर्याद तोरणे यांनी दाखल केली आहे. ही कारवाई सह आयुक्त नाशिक विभाग म.ना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली म.सो. सानप सहायक आयुक्त अन्न संदीप तोरणे, सुवर्णा महाजन, गोविंद गायकवाड अविनाश दाभाडे अन्न सुरक्षा अधिकारी गुप्तवार्ता यांच्या पथकाने हि कारवाई केली. 

संबंधित बातम्या