वनपट्टेधारकांना मिळणार स्वतंत्र सातबारा

वनपट्टेधारकांना मिळणार स्वतंत्र सातबारा
  • MG News
  • जुलै 28 2025

Share on  

महाराष्ट्रात वनहक्कपट्टा जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. वनहक्क कायद्यानुसार वन हक्क पट्टेधारकांचे नाव सदर जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर इतर अधिकारांमध्ये नोंदवलेले असते.या प्रकारच्या वनपट्ट्यांवर विहीर खोदणे तसेच पाईपलाईन करणे व इतर योजनांसाठी शेतकऱ्यांना नव्याने वनविभागाची परवानगी घ्यावी लागते  वर्षानुवर्ष वन जमीन असणाऱ्या लाभार्थी वनपट्टेधारकांचे नाव इतर अधिकारात लावले जात होते.
त्यामुळे अशा वनपट्टेधारकांना स्वतंत्र सातबारा मिळावा याकरिता संबंधित यंत्रणांना निर्देश करावेत अशी मागणी कळवणचे आमदार  नितिन पवार यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे केलेली होती .या मागणीनुसार आता राज्यपालांनी  वनपट्टा धारकांना स्वतंत्र्य सातबारा देण्याचे निर्देश दिले आहेत.

संबंधित बातम्या