गडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत देसाईगंज तालुक्यात 1757 घरकुलाना मंजूरी

गडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत देसाईगंज तालुक्यात 1757 घरकुलाना मंजूरी
  • MG News
  • मे 9 2025

Share on  

गडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत देसाईगंज तालुक्यात 1757 घरकुलाना मंजूरी

     प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत देसाईगंज तालुक्यातील गरजू आणि पात्र लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यात एकूण 1757 घरकुलांची मंजूरी देण्यात आली असून, लवकरच या घरांच्या बांधकामाला गती दिली जाणार आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिक सहाय्य दिले जाणार असून, प्रत्येक लाभार्थ्याला 5 ब्रास रेती मोफत दिली जाणार आहे. त्यामुळे घरकुल बांधणाऱ्या नागरिकांना आर्थिक भार कमी होऊन बांधकाम सुलभ होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

या निर्णयामुळे देसाईगंज तालुक्यातील अनेक कुटुंबांचे घराचे स्वप्न वास्तवात उतरेल, तसेच ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. अधिक माहिती आणि प्रक्रिया संबंधित ग्रामपंचायत कार्यालय किंवा तालुका पंचायत समितीकडे संपर्क साधावा.

 प्रणाली कोचरे, ग्राम गट विकास अधिकारी (BDO)

संबंधित बातम्या