धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य आहे. एकीकडे मनपा प्रशासन नागरिकांकडून कर वसूल करण्यासाठी करता त्यांच्या घरासमोर ढोल बडवतात. मात्र, दुसरीकडे त्याच करातून शहराची स्वच्छता करण्यास टाळाटाळ का करताय. असा प्रश्न शहरातील ठिकठिकाणी साठत असलेल्या कचऱ्याच्या ढिगारामुळे उपस्थित केला जातोय.
केंद्र आणि राज्य शासनाकडून गाव, शहर, जिल्हा, राज्य तसेच संपूर्ण देश स्वच्छ राहावा म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात. यामध्ये स्वच्छ भारत अभियान स्वच्छ, गाव यांसारखे अनेक उपक्रम जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि महापालिका प्रशासन अंतर्गत राबवली जातात. मात्र, धुळ्यामध्ये स्वच्छ भारत अभियानासह विविध अभियानांना केराची टोपली दाखवली जात असल्याचं चित्र समोर येत आहे.
- लक्ष्मण पाटील, मुख्य स्वच्छता निरीक्षक धुळे महानगरपालिका
धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य ठीक ठिकाणी बघायला मिळतंय. शहरातील कचरा नियमितपणे उचलला जावा यासाठी महापालिकेच्या वतीने कचरा संकलनाचे काम एका खाजगी कंपनीला देण्यात आले मात्र, संबंधित ठेकेदाराकडून शहरातील कचरा नियमित गोळा केला जात नसल्याने आता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर संबंधित ठेकेदाराकडून काम करणं अशक्य असल्याचे पत्र प्रशासनाला देण्यात आलं असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेय.
- चंद्रकांत जाधव, प्रभारी स्वच्छता निरीक्षक
प्रशासन कर वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेताय. मात्र शहरातील कचरा प्रशासनाला दिसत नाहीये का? यातच आता महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी दरमहा ५० रुपये सर्वसामान्य धुळेकरांच्या खिशामधून स्वच्छता स्वरूपात काढण्याचा अजब फतवा काढलाय. मात्र, आधीच विविध कर स्वरूपात शहरातील स्वच्छतेचा कर धुळेकर प्रशासनाला देत असताना आयुक्तांचा फतवा नेमका कुणाच्या फायद्यासाठी आहे? असा प्रश्न उपस्थित करत सर्वसामान्य नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे.
- डॉ. श्रीकृष्ण बेडसे, नागरिक