सुवर्णकार हरि ओम वधू वर सांस्कृतिक संस्थेतर्फे "महिला दिनी पुष्पगुच्छाऐवजी मेथीच्या जुड्या

सुवर्णकार हरि ओम वधू वर सांस्कृतिक संस्थेतर्फे
  • MG News
  • मार्च 9 2025

Share on  

 

सिडको, ता. ९ : नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार हरि ओम वधू वर सांस्कृतिक संस्थेच्या वतीने "महिला दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख महिला मान्यवर कांचन दंडगव्हाळ, सुनिता बागुल, स्वाती जाधव, नलिनी मोरस्कर आदी उपस्थित होत्या.

समाजातील विविध स्तरांतील कर्तृत्ववान महिलांचा फेटा बांधून आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे पुष्पगुच्छाऐवजी मेथीच्या जुड्या देण्याची अनोखी संकल्पना राबवण्यात आली.

संस्थेच्या वतीने गरजू मुलींना रोजगाराची संधी देण्यासाठी विनामूल्य नर्सिंग कोर्स सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

लवकरच संस्थेच्या वतीने सामुदायिक विवाह योजनेंतर्गत विवाहोत्सव आयोजित करण्यात येणार असून, इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर किर्ती थोरात, वर्षा दंडगव्हाळ, वृंदा जाधव, सुवर्णा घोडके आदी कार्यकारिणी सदस्य उपस्थित 

 नाशिक : सुवर्णकार हरि ओम वधू वर सांस्कृतिक संस्थेतर्फे "महिला दिन" साजरा करताना महिला वर्ग

संबंधित बातम्या