गोंदिया : जिल्ह्यात आतापर्यंत ३८ कृषी केंद्रावर कारवाई

गोंदिया : जिल्ह्यात आतापर्यंत ३८ कृषी केंद्रावर कारवाई
  • MG News
  • जुलै 25 2025

Share on  

गोंदिया जिल्ह्यात  जास्त दराने युरिया विक्री करणाऱ्या तसेच बनावट खते विक्रीवर करणाऱ्या कृषी केंद्रावर कृषी विभागाकडून कारवाई करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ३८ कृषी केंद्रावर करण्यात येत आहे. कृषी विभागाने नऊ भरारी पथके गठित केली आहेत. तसेच २६ गुणनियंत्रण निरीक्षकांचा समावेश असून, गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत कृषी केंद्रांची अचानक तपासणी करण्यात येत आहे. तसेच आमगाव येथे मध्य प्रदेश राज्यात खत विक्री करत असताना आढळल्याने दोन कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. आणि युरियाची जास्त दराने विक्री केल्या प्रकारे एका केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. आणि पुढील कारवाई प्रस्तावित असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक निलेश कानवडे यांनी सांगितले आहे.

 

संबंधित बातम्या