जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील रामाटोला ग्रामपंचायतील ग्रामसेवकाने विविध कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याच्या आरोप गावकऱ्यांनी केला असून त्यांना कामावरून हटवण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायत रामाटोला येथील ग्रामसेवक श्यामसुंदर बघेले यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व गावकऱ्यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. सभेत शासनाच्या घरकुल योजना, वृक्ष लागवड योजना, तसेच इतर योजनेच्या माध्यमातून ग्रामसेवकाने आपल्या पत्नीच्या नावे,मुलीच्या नावे व इतर नातेवाईकांच्या नावे पैसे काढण्याच्या आरोप करण्यात आला. याबैठकीत ग्रामसेवकाने भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली. त्या अनुसार ग्रामस्थांनी ग्राम सेवकाला कामावरून काढण्याची मागणी केली. जर ग्रामसेवकाला कामावरून काढण्यात आले नाही तर मोठ्या आंदोलन करण्याच्या इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.