जालन्यात शासकीय कंत्राटदरांचं बेमुदत काम बंद आंदोलन

जालन्यात शासकीय कंत्राटदरांचं बेमुदत काम बंद आंदोलन
  • MG News
  • फेब्रुवारी 17 2025

Share on  

 जालन्यात शासकीय कंत्राटदरांनी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर बेमुदत काम बंद आंदोलन केले आहे. महाराष्ट्र शासनाने थकीत देयके कंत्राटदारांना न दिल्याने जालना येथील शासकीय कंत्राटी संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी आपल्या काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. यंत्र सामग्री सोबत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागासमोर जालन्यातील सर्व शासकीय कंत्राटदार काम बंद आंदोलनाला बसलेत. जालना जिल्ह्यातील थकित देयकांची रक्कम सुमारे 400 कोटी पेक्षा जास्त असून, फक्त 16 कोटींची तरतूद तब्बल 7 महिन्यानंतर दि. 14 फेब्रुवारी 2025 रोजी शासनाने कंत्राटदारांना वितरीत केली. त्यामुळे थकीत देयके कंत्राटदारांना तातडीने वितरित करण्यात यावे यासाठी जालना येथील सर्व शासकीय कंत्राटदरांनी बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरु केलं आहे. 
 

संबंधित बातम्या