महाडच्या चवदार तळ्यावर 98 व्या वर्धापन दिनी महामानवाला रायगड पोलिसांची मान वंदना

महाडच्या चवदार तळ्यावर 98 व्या वर्धापन दिनी महामानवाला रायगड पोलिसांची मान वंदना
  • MG News
  • मार्च 20 2025

Share on  

 

 विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड महाडच्या भूमीत चवदार तळ्याच्या पाण्याचा सत्यागृह करून अस्पृश्य समाजाला पिण्याचे पाणी खुले करून दिले. या सत्यागृहाचा 98 व्या वर्धापन दिनानिमित्त चवदार तळ्यावर राज्य आणि देशाच्या काना कोपऱ्यातून मोठ्या संख्येने अनुयायी दाखल झाले आहेत. या ऐतिहासिक व क्रांतिकारक दिवसाचे महत्व जाणून रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली चवदार तळ्यावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पोलीस मानवंदना देण्यात आली. वर्धापन दिनानिमित्त चवदार तळे परिसरात आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आलीय. या दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवर , राजकीय नेते मंडळी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, भीम अनुयायी , बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवाला अभिवादन करतात.

संबंधित बातम्या