शुक्रवार आणि शनिवार महाराष्ट्रात अति पावसाचे

शुक्रवार आणि शनिवार महाराष्ट्रात अति पावसाचे
  • MG News
  • जुलै 25 2025

Share on  

आज शुक्रवार आणि उद्या शनिवार रोजी महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.  सह्याद्री पर्वतरांगेतील  जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर उवर्रीत  जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाल्याचे हवामान खात्याने सांगितलेय. कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत अन् घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तळ कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे  सातारा , कोल्हापूर  जिल्ह्याचा पश्चिम भागात आज शुक्रवारी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासासाठी सात जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात .

मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्गात पुढील ४८ तास पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून मच्छीमाराला समुद्रात न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. किनारपट्टीला ३.८ ते ४.७ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आलाय. पुढील सूचना मिळेपर्यंत लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्यात 

 

 
 

 

 

 

 

 

संबंधित बातम्या