पुणे : योगेश कदम यांनी गुरुवारी स्वारगेट एसटी आगार आणि पोलीस ठाण्याला भेट दिली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे लवकरच पकडला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. ही घटना एसटी स्टँडच्या आवारात घडली. त्यादिवशी स्वारगेट पोलिसांकडून रात्री 12 ते पहाटे सहा वाजेपर्यंत कितीवेळा गस्त घालण्यात आली, हे सीसीटीव्हीत दिसत आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक रात्री दीड वाजता एसटी स्टँडच्या आवारात आले होते. त्यानंतर रात्री तीन वाजता पुन्हा एकदा पोलिसांचे पथक इकडे येऊन गेले. त्यामुळे पोलिसांकडून दुर्लक्ष झाले, ते सावध नव्हते, या आरोपात तथ्य नाही, असे योगेश कदम यांनी म्हटले.