ICC Champions Trophy 2025 Schedule: भारत-पाकिस्तान २३ फेब्रुवारीला आमनेसामने; आयसीसीने जाहीर केलं चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक

ICC Champions Trophy 2025 Schedule: भारत-पाकिस्तान २३ फेब्रुवारीला आमनेसामने; आयसीसीने जाहीर केलं चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक
  • MG News
  • डिसेंबर 23 2024

Share on  

ICC Champions Trophy 2025 Venues and Grounds: अखेर प्रतिक्षा संपली अन् आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील चर्चेला पूर्णविराम लागला असून आता आयसीसीने अखेर स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. आयसीसीने यापूर्वीच ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवणार असल्याचे जाहीर केले होते. या स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना न्यूझीलंड आणि यजमान पाकिस्तान यांच्यात कराची येथे होणार आहे. तर बहुप्रतिक्षित असा भारत-पाकिस्तान सामना २३ फेब्रुवारीला होणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना न्यूझीलंड आणि यजमान पाकिस्तान यांच्यात कराची येथे होणार आहे. फायनल ९ मार्च रोजी होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ फेब्रुवारीला दुबईत होणार आहे. तर यजमान पाकिस्तानमधील रावलपिंडी, कराची आणि लाहोर या तीन शहरांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळवले जाणार आहेत.

संबंधित बातम्या