गुढी पाडावा
- नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा सर्व पत्रकारांच स्वातंत्र्य कायम राहो
- गुढीपाडवा आहे. मराठी नवीन वर्ष, हिंदू नवीन वर्ष असा गुढीपाडवा आहे. अशा अनेक गोष्टींनी आजचा दिवस हा वैभवशाली असतो. महाराष्ट्रात खास करून शोभायात्रा निघतात, विचारांची पण देवाण-घेवाण घेणारे काही मेळावे होत आहेत. मला वाटतं राज ठाकरे यांचा मेळावा आहे, व्हायला पाहिजे. महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूरला संघ मुख्यालयात येत आहेत. त्यांच्यातला संघ स्वयंसेवक जागा झालेला आहे
- आजच्या गुढीपाडव्याला एक महत्त्व आहे. आमचे मोदीजी ईद आणि हिंदू नववर्ष एकत्र साजरा करत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला आनंद आहे हा देश अशाच पद्धतीने चालला पाहिजे
- मोदींनी त्यांच्या अंधभक्तांना नियंत्रणाखाली आणलं तर नक्कीच या देशांमध्ये सुख, शांती, समृद्धी आणि शांतता लाभेल. दुर्दैवाने तसं होत नाही. मोदी स्वतः वेगळं वर्तन करतात आणि त्यांचे अंधभक्त टोकाचं वर्तन करतात
- निवडणुका आल्या की मोदी या देशांमध्ये इतर कोणते धर्म नांदत आहेत याचा विचार करत नाही आणि मग ते एक धर्मीय राज्यकर्ते होतात. निवडणुका आल्यावर आणि मग त्यानुसार मतांची गणित मांडतात. मग या देशात तणाव कसा निर्माण होईल आणि तणावातून मला फक्त हिंदूंची मत कशी मिळतील याचा ते विचार करतात
- मोदी मुस्लिम मोहल्यात जाऊन, मशिदीत जाऊन आणि आज ते संघ मुख्यालयात गेलेले आहेत. स्वागत करतो
- देवेंद्र फडणवीस जाणारच सगळ्यांनी जायला पाहिजे. चुकीचं यात काहीच नाही. विचारधारा या संदर्भात आपले मतभेद असले आपल्या देशामधल्या या महत्त्वाच्या संस्था आणि संघटना आहेत. आपण त्यांचे विचार समजून घेतले पाहिजे
- एकेकाळी आमच्यासारखे लोक सुद्धा संघाचे अत्यंत जवळ होते. पण गेल्या पाच-दहा वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारे संघाचा विचार हा वेगळ्या पद्धतीने मांडण्यास सुरुवात केली त्यामुळे या देशांमध्ये द्वेषाचं वातावरण निर्माण झालं हा आमचा वाद आहे
संघ मुख्यालय भेट
- अटल बिहारी वाजपेयी यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली होती. पण नरेंद्र मोदी हे 11 वर्षानंतर संघ मुख्यालयात जात आहेत. प्रधानमंत्री झाल्यावर त्यांना आता अचानक जाण्याची गरज का भासली? संघ मुख्यालयात जाण्याची हा एक संशोधनाचा विषय आहे
- भारतीय जनता पक्षाच्या राज्य पद्धतीवर संघाचा पगडा वाढत आहे, हे सत्य आहे. अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी हे संघाचे स्वयंसेवक होते आणि त्याच्याविषयी आक्षेप असण्याचं कारण नाही
- संघाचं स्वयंसेवक असल्याचं त्यांनी मान्य केल्यामुळे जनता पक्षाची राजवट कोसळली
- गेल्या दहा-अकरा वर्षापासून प्रधानमंत्री मोदी, अमित शाह गृहमंत्री किंवा अन्य सगळे प्रमुख लोक हे सत्तेत आहेत. प्रधानमंत्री साधारण दहा ते अकरा वर्षानंतर त्यांना संघ मुख्यालय जावेसे वाटलं याबाबत त्यांनी आपलं मन मोकळे केले पाहिजे
- मोदींचा स्वभाव पाहता ते फक्त एकादशी सत्तेसाठी जुळवून घेऊ शकतात. बाकी वैचारिक दृष्ट्या भावनिक दृष्ट्या जुळवून घेतील असे मला वाटत नाही. त्यांचा सहभाग त्याला एटीट्यूड म्हणतात ते फक्त सत्तेसाठी किंवा सत्ता टिकवण्यासाठी जुळून घेऊ शकतात
- जे.पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कालखंड संपलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांच्या पसंतीचा अध्यक्ष या वेळेला हवा आहे. त्याच्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड लांबली
- हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी संघ आणि भाजपा हे वेगळे मानतच नाही. एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जरी आमचा राजकारणाशी संबंध नसला अस जरी ते म्हणत असले किंवा भाजपवाले संघाचे संबंध नाही असे म्हणत असले तरी दोन्ही संस्था एक राजकीय पक्ष अनेक संस्था आहे. हे दोन्ही एकच आहेत आणि एकमेकांच्या विचाराने हातात हात घालून काम करत असतात. मी कोणती भूमिका कधी घ्यावी त्यांचं ठरलेल असतं
- नरेंद्र मोदी संघ मुख्यालयात गेले यात मला आश्चर्य वाटण्याच कारण नाही. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात ही संघाचे प्रचारक म्हणून केली. त्यांनी संघाच्या कार्यालयात काम केलं, त्यांची प्रसिद्धी झाली. त्यांनी त्याच कार्यालयात झाडू मारण्याच्या कामापासून काम केले आहेत
- संघाचे प्रमुख प्रचारक लक्ष्मणराव इनामदार हे त्यांचे गुरु आहेत. लक्ष्मणराव इनामदार त्यांच्या विषयी माहिती आहे, ते त्यागमूर्ती होते. त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात संघाचा प्रचार केला, ते साधे होते, त्यांची राहणी साधी होती
- नरेंद्र मोदी आपले त्यांना गुरु मानतात. आता गुरुंचे किती गुण त्यांच्या गेले आहेत? हे गेल्या दहा वर्षात पाहिले
मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी चर्चा
- नक्कीच अशी बाहेर चर्चा आहे
- ज्या अर्थी जे. पी. नड्डा यांची मुदत संपून देखील नवीन अध्यक्ष अजून नेमू शकले नाही त्या अर्थी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भारतीय जनता पक्षा वरती दबाव आहे
- लोकसभा निवडणुकीत जो भाजपचा पराभव झाला याच कारण संघ कार्यकर्ते प्रचारापासून दूर राहिले आणि विधानसभा निवडणुकीत खास करून महाराष्ट्रात सारख्या राज्यांमध्ये भाजपचा विजय झाला. संघाने दाखवून दिले आम्ही काय करू शकतो आणि काय करू शकत नाही. संघ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उतरले. महाराष्ट्रामध्ये हजारो सभा घेतल्या, लहान लहान सभा घेतल्या, लोकांपर्यंत पोहोचले आणि महाराष्ट्रात त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये विजयात हातभार लावला. बाकी तांत्रिक गोष्टी आहेत. चोऱ्या-माऱ्या, लबाड्या पण संघाचा यात सहभाग आहे
- वमतदार यादी मध्ये काढण्यापासून एखाद्या भागात आणि नाव घुसवणारे पर्यंत संघाचे यंत्रणा काम करत होती
शेतकरी कर्जमाफी
- अजित पवार यांची विधानसभा निवडणुकीपूर्वीची भाषा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची भाषा पूर्णपणे वेगळी होती. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यापासून ते कर्जमाफीपर्यंत करणारच च वर जोर देऊन देऊन सांगत होते. आता अजित पवार यांनी हात वर केले आहेत. अजित पवार यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. जर ते कर्जमाफी करू शकत नाही आणि लाडक्या बहिणींना 2100 देणार नसतील तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्याबद्दल त्यांचा राजीनामा जनतेने मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे
- आजच मी दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य ऐकलं. जेव्हा अजित पवार किंवा त्यांच्या युतीने एक घोषणा केली. 2100 रुपये देऊ, लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे होते. तेव्हा त्याच्यामुळे हे जबाबदारी एकनाथ शिंदे यांची जास्त आहे. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी जनतेला वचन दिलं. आज ते उपमुख्यमंत्री आहेत
- काही झालं तरी आम्ही आमच वचन पूर्ण करणार, कस करणार, तुमचे अर्थमंत्री आणि डेप्युटी सीएम नाही म्हणत आहेत. एकनाथ शिंदे यांनी एक करावं जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देत नाही तोपर्यंत मी देवगिरी बंगल्या बाहेर उपोषणाला बसणार त्यांनी उपोषणाला वसा व त्यांच्या लोकांसह जनतेचे नेते आहेत. लाडके भाऊ आहेत, बहिणीचे लाडके भाऊ आहेत. शेतकऱ्यांचे लाडके पुत्र आहेत. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी वचन दिल आहे. त्याच्यामुळे त्यांना दाखवावे लागेल की मी वचनाला किती पक्क आहेत
- प्राण जाये पण वचन ना जाये ही एका शिवसैनिकाची आणि मराठा मावळ्याची भूमिका असते. तुमच्या डोळ्यासमोर लाडक्या बहिणीची फसवणूक चालली आहे. एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना गंडवले जात आहे. तुम्ही काय करत आहात सरकारमध्ये बसून? अजित पवारांच्या दारासमोर उपोषणाला बसा, आंदोलन करा शिवसेनेच्या आत्मा आंदोलन हा आहे. तुम्ही खरे शिवसैनिक असाल तुमच्याकडे जरी नकली शिवसेना असली तुम्ही स्वतःला शिवसैनिक मानताना तर देवगिरीच्या बाहेर आंदोलन करा
मनसे गुढीपाडवा मेळावा
- राज ठाकरे यांचा पक्ष सध्या भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष आहे. आता भाजपचा मित्र पक्षाचा तो मेळावा आहे. त्याच्यामध्ये त्यांची भूमिका मी पाहतो
- त्यांच्या घरी लोक चहापाण्याला येतात. भाजपचे ही सर्व लोक त्यांनी काहीतरी भूमिका घेतली तरी त्या भूमिकेवर भाजपची छाप असेल भाजपच्या प्रभाव असेल
- उद्याच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सोयीची काय भूमिका घेता येईल अशी भूमिका राज ठाकरे येऊ शकतात या कोणी त्यांनी घेतली आहे
- मराठी माणसाला कमजोर केलं जात आहे. अशा वेळेला भारतीय जनता पक्षाला साथ देणं, एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकांना मदत करणं, हे महाराष्ट्राच्या एकंदरीत अस्मितेला आणि स्वाभिमानाला परवडणार नाही आणि मराठी माणसाला कमजोर करणाऱ्या भूमिका राज ठाकरे यांनी घेऊ नये अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे
कुणाल कामरा सामना
- कुणाल कामरा किंवा इमरान प्रतापगडी हे लिहिणारे, बोलणारी लोक आहेत. सुप्रीम कोर्टाने समर्थन केलं आहे. मी कशाला करू देशाच्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. कुणाल कामरा किंवा अन्य कोणाला आपली भूमिका मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे
- देशाचा स्वातंत्र्य इतका कमजोर नाही आहे. एखाद्या कवितेमुळे, एखाद्या गाण्यामुळे ते दळमळीत होईल हे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. असं असताना या महाराष्ट्रामध्ये कुणाल कामराविरुद्ध गुन्हे दाखल होत असतील तर ते दुर्दैव आहे