बुद्धगया येथील महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौध्दांच्या ताब्यात देण्याकरीता आज अमरावती येथे भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य मोर्चा काढला असून, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
महाबोधी विहार बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे याकरीता १९९२ पासून आंदोलने सुरू आहेत. तरीही कायद्यात बदल न झाल्याने आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. महाबोधी विहाराचे व्यवस्थापन हिंदु धर्मियांकडे असल्याने याठीकाणी ब्राम्हणवादी पुजा आणि कर्मकांड वाढत आहे. ज्या रूढी परंपरा तथागत गौतम बुध्दांना मान्य नव्हत्या त्याच आज या विहारामध्ये सुरू असल्याने वंचित बहुजन आघाडी या मंदीराच्या व्यवस्थापनाच्या हस्तांतरणाकरीता आक्रमक झाली आहे.
BYTE - मोसमी नंदा गवडी