सिडको, ता. ९ : डॉ. सुधीर फडके सार्वजनिक वाचनालय, सीआयटीयु आणि जनवादी महिला संघटनेच्या वतीने जागतिक कामगार महिला दिनानिमित्त “स्त्री : काल, आज आणि उद्या” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. सुप्रसिद्ध विचारवंत आणि संपादक दीप्ती राऊत आणि कवयित्री अनिलराव वाघ यांनी व्याख्यान दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड होते. वाचनालयाचे कोषाध्यक्ष कवी विवेक उगलमुगले यांनी सूत्रसंचालन करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमात ॲड. वसुधा कराड यांनी चार कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला. त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. लहान विद्यार्थिनींचाही विशेष सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. डी. एल. कराड यांनी महिलांच्या योगदानाचे महत्त्व विशद केले. रेखा खैरनार आणि रत्नमाला सोनजे यांनी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या शिक्षिका शकुंतला जायभावे, सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. सिताराम ठोंबरे, ॲड. तानाजी जायभावे यांच्यासह अनेक मान्यवर आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाने महिला सबलीकरणाचा संदेश दिला आणि उपस्थितांना प्रेरित केले.
सिडको : कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर