शिक्षक भरती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा : आमदार सुधाकर अडबाले 

शिक्षक भरती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा : आमदार सुधाकर अडबाले 
  • MG News
  • एप्रिल 29 2025

Share on  

शिक्षक भरती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा : आमदार सुधाकर अडबाले 

नागपूर येथे उघडकीस आलेला शिक्षक भरती घोटाळा हा केवळ नागपूर पुरता मर्यादित नसून या घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. या घोटाळ्यामुळे महाराष्ट्र हा प्रती बिहार होतो की काय असं वाटतय. या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी सोबतच वर्धा जिल्ह्यात शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना देण्यात आलेल्या प्रभारी पदभारचे प्रकरण सुद्धा नियमांना डावलून आहे. यामुळे या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेत कारवाईची मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून करण्यात आल्याचं शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितलय. ते वर्धेत पत्रकारांशी संवाद साधतं होते.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधी न घडलेला किंवा या महाराष्ट्राचा प्रतिबिहार होते की काय असे या ठिकाणी वाटायला लागल आहे. नागपूरचा शिक्षक भरतीचा घोटाळा हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. यामध्ये 2012 ते 2022 च्या दरम्यान बॅक डेट च्या नियुक्त्या दाखवून या नियुक्ती या ठिकाणी संस्थाचालक कर्मचारी आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी एकत्र येऊन हा केलेला फार मोठा घोटाळा आहे. तुमच्या आमच्या कराच्‍या माध्यमातून जमा झालेल्या पैशाचा अपव्यय कारण्याचं काम या माध्यमातून होताना दिसत आहे.या संदर्भामध्ये  सायबर सेलला तक्रार झाली आणि सायबर सेलच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे.


11 एप्रिलला नागपूर सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाली त्या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालक या कार्यालयामध्ये काम करणारे चार अधिकारी आणि कर्मचारी आणि वेतन पथक अधीक्षक प्रायमरी मध्ये काम करणारे वेतन पथक अधीक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आज पोलीस विभाग या ठिकाणी सगळी चौकशी करत आहे.  रोज एक एक दोघांना अटक केली जात आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची अशी मागणी आहे की या घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आहे.नागपूर पुरत मर्यादित न राहणारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन मे 2012 पासून ज्या काही नियुक्त झाले असेल बोगस नियुक्त झाले असेल यावर एसआयटी नियुक्त करून त्या नियुक्त संदर्भात तपासणी करावी. जे दोषी असतील शिक्षण विभागाचे अधिकारी असतील संस्था चालक असतील त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी. याच आजच वर्धेच्या जिल्हाधिकारी यांच्या मार्फत  आम्ही शासनाला निवेदन पाठवला आहे आणि संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणं अपेक्षित आहे असं आमदार सुधाकर अडबोले यांनी सांगितलय.

संबंधित बातम्या