केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मतदारसंघात आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसूती
जळगावच्या चोपडा तालुक्यात बोरमडी येथील आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना घडली आहे.तब्बल अर्धातास फोन करून सुद्धा रुग्णवाहिका आली नाही, त्यामुळे महिलेला तिचे पती दुचाकीवरून रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच प्रसूती झाली.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा चोपडा हा मतदार संघ आहे तर दुसरीकडे जिल्ह्यात तीन कॅबिनेट मंत्री असताना महिलेला अशा पद्धतीने प्रसूती होण्याची वेळ आली असेल तर यापेक्षा वाईट ते काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आदिवासी महिलांच्या अशा पद्धतीच्या प्रसूती बद्दल आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांनी सरकारवर मोठा संताप व्यक्त केला आहे.