रावेर तालुक्याच्या निंबोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत तापी नदीच्या पात्रात २५ ते ३० वयोगटातील महिलेचे प्रेत आढळून आले आहे. हातपाय बांधलेले, पायाला सिमेंटच्या पोल बांधलेला. वगळ्याला घट्ट ओढणी बांधलेली या अवस्थेत प्रेत आहे. सदर घटनेची माहिती पोलीस पाटलांनी निंभोरा पोलीस स्टेशनला कळवले असता, सदर ठिकाणी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी जाऊन पंचनामा केला. अवस्थेत मिळून आली.
महिलेचे प्रेत तीन-चार दिवस पाण्यात राहिल्याने प्रेताची अवस्था बघत ठिकाणी पोस्टमार्टम करण्यात आले. सदर महिलेच्या पेहरावरून ती महिला आदिवासी असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. मध्य प्रदेश आणि लगतच्या परिसरातील पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल आहे का? या संदर्भात तपास करण्यात येत आहे. निंभोरा पोलीस स्टेशनला अज्ञान व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून, तपास करण्यात येत असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले.