जालना : कौटुंबिक वादाच्या चालू वर्षात 22 तक्रारी

जालना : कौटुंबिक वादाच्या चालू वर्षात 22 तक्रारी
  • MG News
  • मे 24 2025

Share on  

जालना : कौटुंबिक वादाच्या चालू वर्षात 22 तक्रारी

         पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताज असतानाच जिल्ह्या-जिल्ह्यातील कौटुंबिक वाद आता चव्हाट्यावर येऊ लागलेत. जालना जिल्ह्यात चालू वर्षात कौटुंबिक तसेच पती-पत्नीतील वादाची 22 प्रकरणं समोर आली आहेत. दारू पिऊन पत्नीला त्रास देणं, मारहाण करणं, अफेअर असणं, पत्नीच्या माहेरकडून पैशाची मागणी होत असल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे. जालन्यातील भरोसा सेलने ही माहिती दिली आहे. 2025 मध्ये भरोसा सेलकडे पती-पत्नी वादाच्या 22 तक्रारी दाखल झाल्या असून, या पैकी 9 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तर 13 तक्रारी तडजोडीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. भरोसा सेलकडे आलेल्या 22 पैकी 6 प्रकरणावर तडजोड होत नसल्याने कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांना 6 पत्र देण्यात आले आहे. 2024 मध्ये भरोसा सेलकडे 138 जोडप्यांच्या तक्रारी आल्या होत्या. यापैकी 136 तक्रारी भरोसा सेलने निकाली काढल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक उमा घोरपडे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या