जालना : 2 नंबरचे धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण

 जालना : 2 नंबरचे धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण
  • MG News
  • मे 21 2025

Share on  

 जालना : 2 नंबरचे धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण 

 जालना शहरात दोन नंबरचे धंदे सर्रासपणे सुरू आहेत. यामध्ये मटका, सट्टा, दारू, लॉटरी हे सर्व धंदे बंद करून धंदे चालवणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये घाला अशी मागणी 
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यासाठी बसलेल्या काँग्रेसच्या असंघटित कामगारांच्या  कार्यकर्त्यांनी केली आहे. शहरातील सर्व ब्लॅक धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. आधी शहरात अशा प्रकारचे व्यवसाय नव्हते. मात्र, या सरकारच्या काळात असे दोन नंबरचे धंदे सुरू झाल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. या व्यवसायिकांवर गुन्हे दाखल झाले तरी उपोषण स्थगित करणार नाही त्यांचावर अटकेची कारवाई करा अशी मागणी उपोषण कर्त्यांनी केली आहे. 
 

संबंधित बातम्या