जालना-नांदेड महामार्ग जमीन अधिग्रहणाबाबत पुन्हा सुनावणी होणार

 जालना-नांदेड महामार्ग जमीन अधिग्रहणाबाबत पुन्हा सुनावणी होणार
  • MG News
  • मे 27 2025

Share on  

 जालना-नांदेड महामार्ग जमीन अधिग्रहणाबाबत पुन्हा सुनावणी होणार

जालना-नांदेड समृद्धी महामार्ग संपादन करण्याआधी जमिनीचे फेरमूल्यांकन करून सुरू असलेल्या बाजारभावाच्या पाचपट मोबदला द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडल्या. त्यामुळे पुन्हा सुनावणी होऊन शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील, अशी अपेक्षा खोतकर यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या