झालावार : प्रार्थनेसाठी विद्यार्थी जात असताना छत कोसळले.

झालावार : प्रार्थनेसाठी विद्यार्थी जात असताना छत कोसळले.
  • MG News
  • जुलै 25 2025

Share on  

राजस्थानच्या झालवार जिल्ह्यातील मनोहरठाणा या गावात  शाळेची छत कोसळून विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडलीये. विद्यार्थी शाळेच्या नियमित प्रार्थना सभेला उपस्थित असताना हा अपघात झाला. छताच्या ढिगाऱ्याखाली अनेक विद्यार्थी अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचे गांभीर्य पाहून प्रशासनाने जेसीबी मशीन बोलावून ढिगारा काढण्यास सुरुवात केली. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक विद्यार्थी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य वेगाने सुरू आहे.

ढिगाऱ्यातून बाहेर काढलेल्या जखमी विद्यार्थ्यांना तातडीने मनोहरठाणा येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. काही मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना झालावाड जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

संबंधित बातम्या