कल्याण : दिव्यांगांच्या डब्यात बसल्यावर अंध महिलेला मारहाण, मोहम्मद बेग अटकेत
काजूरमार्ग रेल्वे स्थानतातून टिटवाळ्याला जाण्यासाठी एका अंध महिलेने गाडी पकडली. ती दिव्यांगांच्या डब्यात चढली. तिला सीटवर बसू न दिल्याच्या कारणावरुन तिला एका धडधाकट प्रवाशाने मारहाण केली. या मारहाणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. या घटनेची गंभीर दखल कल्याण रेल्वे पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणी अंध महिलेला मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मोहम्मद बेग याला मुंब्रा येथून अटक केली आहे.
टिटवाळा येथे राहणारी अंध महिला ही काही कामानिमित्त मुंबईला गेली होती. १६ मे रोजी तिने रात्री नऊ वाजताच्या सुमारास कांजूरमार्ग रेल्वे स्थानकातून टिटवाळ्याला येण्यासाठी गाडी पकडली. ती अंध असल्याने तीने दिव्यांगांच्या डब्यात प्रवेश केला. त्याठिकाणी तिला सीटवर बसू दिले गेले नाही. तिने विरोध केला असता विरोध करणाऱ्या इसमाने तिला मारहाण केली. विरोध करणाऱ्या इसामासोबत त्याची गरोदर पती आणि मुलगीही होती. अंध प्रवासी महिलेला मारहाण झाली. तेव्ही तिनेगाडी थांबविण्याकरीता गाडीची चैन खेचण्याचा प्रयत्न केला होता. गाडी काही थांबली नाही. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ कांदे यांनी घेतली. त्यांनी सदर महिलेची तक्रार नोंदवून घेत मारहाण करणाऱ्या इसमाच्या विरोधात विनयभंगाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या तपासाकरीता त्यांनी तीन तपास पथके नेमली. गुन्हा दाखल होताच अवघ्या एका तासाच्या आत मुंब्रा येथून आरोपी मोहम्मद बेग याला अटक केली. बेग हा प्लंबरचे काम करतो. पिडीत अंध महिलेने सांगितले की, आम्ही अंध आहोत. आमच्यासाठी दिव्गायंकरीता राखीव डबा आहे. त्या डब्यातून धडधाकड प्रवासी प्रवास करतात. त्यांना रोखले की ते अरेरावी करुन प्रसंगी मारहाण करतात. तोच प्रकार माझ्यासोबत झाला. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीच्या मुकक्या आवळल्या आहेत. असे प्रकार होऊ नये अशी आमची आपेक्षा आहे.