कल्याण : भर पावसात नाल्याच्या कामासाठी रस्त्याचे खोदकाम, 

कल्याण : भर पावसात नाल्याच्या कामासाठी रस्त्याचे खोदकाम, 
  • MG News
  • जुलै 27 2025

Share on  

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निष्काळजी आणि नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील नागरिक पुन्हा एकदा त्रस्त झाले आहेत. कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरातील पंचमुखी कॉलनीतील नाल्याच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आला आहे. मात्र तब्बल पंधरा दिवसांपासून हे काम खोदण्याचे काम ठप्प आहे. परिणामी, शेकडो रहिवाशांचा मुख्य मार्ग बंद झाला आहे. शाळकरी मुले,  चाकरमानी आणि स्थानिक नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
      कल्याणमधील पंचमुखी मारुती कॉलनीत नाल्याचे काम ऐन पावसाळ्याच्या सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी आधीच प्रशासनाला विनंती केली होती की पावसाळ्याच्या काळात खोदकाम करू नये. मात्र या विनंतीचा महापालिका प्रशासनाने कोणताही विचार केला नाही. या भागातील सुमारे दहा सोसायट्यांमधील हजारों नागरिकांचा  संपर्क पूर्णतः तुटलेला आहे.  या खोदलेल्या रस्त्यावर अपघात होण्याचा धोका प्रचंड वाढला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कृती झालेली नाही. काही ठिकाणी तर खोदकाम केल्यानंतर तिथे यंत्रणाही दिसून येत नाही. त्यामुळे अपूर्ण कामावर तात्पुरती व्यवस्था करण्यात यावी असी मागणी जोर धरत आहे.

संबंधित बातम्या