शहरातील महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता दहावी मधील विद्यार्थिनी श्रावणी लिमकर हिचा सज्जनगडावर मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली..
श्रावणीला हृदयाला छिद्र होते. तिला नेहमी धाप लागत असल्याने तिचे आई-वडील तिला सहलीला पाठवत नव्हते मात्र तिने मी सज्जनगड चढणार नाही. मला कास पठार पहायचे आहे अशी विनंती केली. त्यानंतर श्रावणी करमाळा येथील शहाणे क्लासेस मधील अकरा विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकांसह सहलीला गेली .सज्जनगड येथे गेल्यानंतर तिला गड चढण्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विरोध केला असता तीने विरोध डावलून सज्जनगड चढण्यास सुरवात केली. श्रावणीने गडावर जाऊन देवदर्शन घेतले तसेच आई-वडिलांनाही व्हिडिओ कॉल केला. त्यानंतर तिला हृदयाचा त्रास सुरू झाला आणि तिला आलेल्या जोराच्या हृदयविकाराच्या झटक्याने तिचा गडावरच मृत्यू झाला.
तिच्यावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई-वडील, आजी आजोबा, तीन बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे. येथील गजराज तरुण मंडळाचे संचालक राहुल लिमकर यांची ती कन्या होती