महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान,सोलापूर जिल्हा अभियान व्यवस्थापक कक्ष आणि करमाळा तालुका अभियान कक्ष यांच्या अंतर्गत सुरु केलेल्या साऊली महिला शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडतर्फे नुकतीच इराण मध्ये 21 मेट्रिक टन केळी निर्यात करण्यात आली. यासाठी कंपनीने टेक्नोसर्व्ह संस्थेचे मुख्य प्रकल्पप्रमुख प्रफुल्ल बेहरा,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली के.डी एक्सपोर्ट यांच्याशी व्यापारी करार केला आहे.यामध्ये महिलांना के.डी एक्सपोर्ट कंदर या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण डोके यांचे मार्गदर्शन लाभले. कंटेनर निर्यात करतेवेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे , जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे , माढा तालुका अभियान व्यवस्थापक, अवधूत देशमुख करमाळा तालुका अभियान व्यवस्थापक सुषमा बिचुकले, टेक्नोसर्व्ह कंपनीचे मुख्य प्रकल्प प्रमुख प्रफुल्ल बेहरा, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक मृत्युंजय कुमार, विभागीय व्यवस्थापक चंद्रवीर सिंह, सहयोगी अधिकारी योगेश सातपुते, महेश बोराडे, सूर्यकांत वाघोले, प्रभाग समन्वयक शुभम निमगिरे, के. डी. एक्स्पोर्टचे क्षेत्र अधिकारी विलास झोळ यांच्यासह सर्व कंपनीचे संचालक,शेतकरी बांधव उपस्थित होते.