सोशल मिडीयावर मांडलेल्या मतांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या केतकी चितळेने महाराष्ट्रात मराठीतच बोलले पाहिजे. या मुद्द्यावर आपले मत एका व्हिडीओतून मांडलयं. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय.या व्हिडीओत केतकीने मराठी सक्तीच्या विरोधात मत प्रदर्शन केले आहे.ज्यात ती म्हणते की,
मराठीत बोल-मराठीत बोल हे काय आहे. मराठी येत नाही. अरे! तो बोलेल नाही बोलणार, त्याने काय मराठी भाषेचं नुकसान होतंय का? भोकं पडतायत का? नाही ना! तुम्ही तुमची स्वतःची इंसिक्योरिटी दाखवताय. त्याने काय फरक पडतोय? कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही.' सगळ्याच भाषांना अभिजात हा दर्जा द्या.असेही मत तीने या व्हिडीओत मांडलयं
केतकीने 'तुझं माझं ब्रेकअप', 'लक्ष्मी सदाशिव मंगलम', 'सास बिना ससुराल', 'आंबट गोड' या मालिकांमध्ये काम केलंय. त्यानंतर ती कोणत्याही मालिकेत दिसली नाही.