कोल्हापूर  : खेळणी मोडक्या अवस्थेत , आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन

कोल्हापूर  :   खेळणी मोडक्या अवस्थेत , आम आदमी पार्टीच्या वतीने  आंदोलन
  • MG News
  • मे 8 2025

Share on  

कोल्हापूर  : उद्यानांमधील लहान मुलांची खेळणी मोडक्या अवस्थेत असल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने लक्षवेधी आंदोलन

 कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या अनेक गजबजलेल्या उद्यानांमधील लहान मुलांची खेळणी मोडलेल्या अवस्थेत आहेत. प्रचंड दुरावस्था झाल्यामुळे ही खेळणी लहानग्यांसाठी धोकादायक देखील बनलेली आहेत. त्यामुळेच आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. यावेळी उद्यानातील लहान मुलांची खेळणी प्रतिकात्मक स्वरुपात महापालिकेसमोर रस्त्यावर मांडून या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आलं. तसेच या प्रतिकात्मक आंदोलनात लहान मुलांना त्या खेळण्यांवर खेळवून महापालिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महापालिका परिसर दणाणून सोडण्यात आला. तर महापालिका प्रशासनाने तातडीने उद्यानांमधील खेळणी न बदलल्यास अधिकाऱ्यांच्या घरासमोरच अशी खेळणी मांडून आंदोलनाचा इशारा आपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

संदीप देसाई (प्रदेश संघटक, आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य)

संबंधित बातम्या