भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र नंबर वन आहे ,असे प्रतिपादन माजी आमदार राजू पाटील यांनी केले.मानपाडासह नेवाळी तसेच श्री मलंगगड रोड या ठिकाणचे काम तीन वर्षापुर्वी पुर्ण झाले. या कामावर ४५ कोटी खर्च झाले. मात्र आता पुन्हा त्याची निविदा निघत आहे महाराष्ट्रात सगळ्यात मोठा कुठला घोटाळा सुरू असेल तर रस्ता घोटाळा सुरू आहे सर्वांचेच हात याच्यात रंगलेले आहे असेही राजू पाटिल पुढे म्हणाले.