गुलमोहर शासकीय विश्रामगृहप्रकरणी अंदाज समिती मधील लाभार्थी आमदारांना आरोपी करा- अनिल गोटे
धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकडच्या प्रकरणानंतर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नसल्याने माजी आमदार अनिल गोटे हे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असून आपण सांगितल्यानंतरही अद्यापही गुन्हा दाखल झाला नसल्याचे आपण त्यांना सांगितले असून त्यादिवशी आपण सायंकाळी सहा वाजता पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर ते शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी आले नाहीत. यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील अनिल गोटे यांनी केली आहे.