पाणंद रस्ता रोखल्याने मानसिक तणावातून आत्महत्या करण्याची घटना मानवत येथे घडलीये. श्याम चव्हाण असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.श्याम चव्हाण काँग्रेसचे मानवत शहराचे माजी शहराध्यक्ष आहेत .याप्रकरणी मानवत पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
श्याम चव्हाण यांचा मानवत शिवारात खडी क्रशर मशीनचा व्यवसाय आहे. त्यांच्या जागेच्या शेजारी दोन वर्षांपूर्वी शहरातील शिवाजी दहे यांनी जमीन खरेदी केली होती. या शेतातून पाणंद रस्ता होता.हा रस्ता शिवाजी दहे यांनी रहदारीसाठी बंद केल्याने वाद होत होता. या प्रकरणाची तहसीलदार यांच्याकडे सुनावणी झाल्यानंतर हा रस्ता रहदारीसाठी मोकळा करण्याचा आदेश देण्यात आला. असे असताना दहे या रस्तावर रहदारी करू देत नव्हते. या कारणाने श्याम चव्हाण मागील काही दिवसांपासून तणावात होते.
या तणावात यांनी राहत्या घरामागील गोदामात गळफास घेऊन आत्महत्या केली.