काल शुक्रवारी भाजपा नेत्यांकडून पत्रकार परिषद घेवून एकनाथ खडसे यांचे अनेक महिलांशी संबंध होते. त्या महिला रात्र-रात्र यांच्याकडे येऊ राहायच्या, सकाळी लोकं त्यांना सोडायला जायचे, असा आरोप केला होता.
त्या आरोपांना आज शनिवारी एकनाथ खडसे यांनी उत्तर दिले. एकनाथ खडसे यांनी सांगितले की, मला आनंद वाटला असता ही पत्रकार परिषद शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी, कर्जमाफी विषयी झाली असती तर.परंतु ही पत्रकार परिषद मला टार्गेट करण्यासाठी आमदारांना आणि इथल्या मंत्र्यांना घ्यावी लागली. मला या आमदारांवर फार काही बोलायचं नाही, कारण आता जे आमदार आहेत, त्यांना मीच घडवलेलं आहे.
पुढे बोलताना खडसे म्हणाले की, मंगेश चव्हाण यांनी माझ्या चारित्र्यावर आरोप केलायं. मी जवळपास १९८० पासून ते आतापर्यंत जवळपास ४५वर्ष सक्रिय राजकारणात आहे. गिरीश महाजन हे अर्ध्या खात्याचे मंत्री आहे. मी बारा खात्यांचा कॅबिनेट मंत्री होतो. त्यांना पूर्ण खातं देखील मिळालेलं नाहीये.
मी मंगेश चव्हाणांना आव्हान करतो की, तुमच्याकडे माझ्यासंदर्भात एक छोटी गोष्ट देखील पुरावा म्हणून असेल तर ती समाजासमोर दाखवा, गप्पा मारू नका. जर तुम्ही पुरावा दिला तर मी सक्रिय राजकारणातून संन्यास घेईल,असे एकनाथ खडसे म्हणाले.