अमरावती शहरातून एका धक्कादायक घटना समोर येते आहे .नाशिकमधील भक्ती गुजराथी या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या व्यक्तींना अटक केल्यास २४ तास होत नाही तोच अमरावतीहुन विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आलीये दुसरी मुलगीच झाली म्हणून सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून शुभांगी तायवाडे यांनी गळफास लावून आत्महत्या केली .या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली असून ५ अटक करण्यात आली आहे.शुभांगी, अंजनसिंगी प्राथमिक आरोग्य उप केंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत तर त्यांचे पती निलेश तायवाडे सेंट्रल बँकेत वरिष्ठ शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत