राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार आहे : देवेंद्र फडणवीस

राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार आहे :  देवेंद्र फडणवीस
  • MG News
  • जुलै 27 2025

Share on  

राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार आहे.  मात्र पत्र लिहून कोणी वाद निर्माण करू नये. मंत्र्यांनी आपसात बोलावे. आणि त्यांना काही अडचणी असेल तर त्यांनी मला येऊन सांगावे. म्हणजे त्याच्यातील अडचणी दूर करता येईल. मंत्री आणि राज्यमंत्री हे दोघे शासनाचे भाग असतात. मंत्री जे अधिकार देतात ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात. त्यामुळे याच्यात कुठलंच कन्फ्युजन नाही. मात्र राज्य मंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही असं मानणे  चुकीच आहे. राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार आहे  पण काही धोरणात्मक निर्णय असतील तर ते मंत्र्यांशी बोलल्याशिवाय घेता येत नाही. मंत्र्यांची मान्यता घ्यावी लागते. मंत्री आणि राज्यमंत्री दोघांनी सामंजस्य दाखवल पाहिजे. काही अडचण असेल माझ्याशी बोलल पाहिजे, असे प्रतीपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. माधूरी मिसाळ यांनी लिहलेल्या पत्रामुळे झालेल्या वादावर ते भुमिका मांडत होते. 
     जन्मदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जाणे याच्याकडे राजकारणातून पाहु नये.महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसले आहे. महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल.. आता  काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात जे आहे ते महाराष्ट्राच्या मनातील आहे  असं म्हणणं योग्य नाही. ते फार मोठे स्टेटमेंट होईल. असेही मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले

संबंधित बातम्या