पुरोगामी महाराष्ट्र हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने चालणारा असून आज राज्यांमधील अनेक नेते मंडळीना त्यांच्या विचारांचा विसर पडला आहे त्यामुळेच त्यांच्याकडून धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करणारी विधाने केली जात आहेत या नेतेमंडळी आणि मंत्र्यांनी महाराष्ट्रात फूटपडू नये आणि दोन समाजामध्ये तेड निर्माण होऊ नये हा विचार करून आपली वक्तव्य करावीत, आजवर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सर्वधर्म समभावाचे विचार ठेवून राजकारण केले आहे त्यांच्या विचाराच्या प्रेरित राजकारण करणे गरजेचे असून महाराष्ट्राला सहन होणार नाहीत आणि महाराष्ट्र तुटेल अशी कोणीही विधाने करू नयेत असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले असून सातत्याने दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे आणि सातत्याने कोणता तरी वाद ओढवून घेणारी विधाने करणारे मंत्री नीतेश राणेंचे कान टोचले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त सातारा दौऱ्यावर आले होते त्यांनी साताऱ्यातील कराड येथे असलेल्या प्रीतीसग्मावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला भेट देऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतलेया वेळेला पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील ,आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील विविध मान्यवर नेते मंडळी उपस्थित होते
BYTE - अजित पवार, उपमुख्यमंत्री