पतंगबाजी करताना नायलॉन मांजाचा वापर केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. या धोकादायक मांजामुळे या कालावधीतअनेक पक्षी, प्राणी जखमी होतात, तर काही मृत्युमुखी पडतात. हे कापलेले धागे पतंगांसोबत जमिनीवरच राहतात आणि ते जैवविघटनशील नसल्यामुळे मातीमध्ये मिसळत नाही. दुचाकीस्वाराचे वाहन वेगात असते, तेव्हा नायलॉन मांजा समोरून आल्यावर थेट त्याच्या गळ्यावर अडकतो. अशाने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबतच्या घटना घडू नये म्हणून शहरात कित्येक वर्षांपासून नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे.. यावर्षी तर नायलॉन मांजा बंदी कडे पोलीस प्रशासन व महानगरपालिका गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे समोर येत आहे. जुने नाशिक भागात खुलेआम रस्त्यावर नायलॉन मांजा विकला जात आहे विकत घेतला जात आहे. महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे दुर्घटना घडण्याचे प्रकार देखील झालेले आहे त्यामुळे याबाबत आमदार देवयानी फरांदे आक्रमक झालेले आहे येत्या दोन दिवसात याबाबत तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री मॅडम व पोलीस आयुक्त संदीप कर्डिक यांच्याकडे केलेली आहे आमदार देवयानी फरांदे यांनी केलेल्या मागणीप्रमाणे पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासन यांच्याकडून कारवाई करण्यात न आल्यास दोन दिवसांनी मला स्वतःला रस्त्यावर उतरून कारवाई करणे भाग पडेल असा इशारा दिलेला आहे..