मुंबई : राज्यातील ७,००० शिक्षकांच्या. नोकऱ्या धोक्यात

मुंबई : राज्यातील ७,००० शिक्षकांच्या. नोकऱ्या धोक्यात
  • MG News
  • जुलै 28 2025

Share on  

राज्यातील तब्बल ७,००० शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.   राज्य शैक्षणिक मंडळाचा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या बहुसंख्य शाळांमधील पटसंख्या कमी होत आहे. या घटणाऱ्या पटसंख्येमुळे त्या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती निर्माण व्यक्त केली जात असताना  दुसरीकडे आता राज्य शासनाच्या एका नव्या आदेशाने त्यात भरच पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कला शिक्षण मंडळाने ५०० विद्यार्थ्यांना मागे एक कला शिक्षक असावा असा एक नवीन आदेश काढलेला आहे. ज्यामुळे ५०० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेतील कला शिक्षकांना नोकरी गमवावी लागू शकते‌

 नवीन शैक्षणिक धोरण हे सृजनशीलतेचा म्हणजेच शिक्षणाचा आग्रह धरणारे धोरण आहे. विद्यार्थ्यांच्या सुर्जनशीलतेचा विकास करायचा असेल तर त्यांना मैदानी खेळांसोबतच आणि इतर क्रीडा उपक्रमांसोबतच चित्रकला, हस्तकला आणि दृश्यकला हे विषय सुद्धा शिकवणे आवश्यक आहे.ज्यासाठी वैयक्तिक लक्ष देण्याची गरज असल्याने ५०० विद्यार्थ्यांना एकच शिक्षक शिकवू शकेल याची खात्री देता येत नाही‌.मात्र राज्य सरकारने आता ५०० विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक नेमायचा असा आदेश काढलेला आहे. साहजिकच यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य आणि त्यांच्या सुर्जनशीलतेचा विकास याला मोठा धक्का पोहोचणार आहे.

संबंधित बातम्या